A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे प्रभो विभो अगाध किती

हे प्रभो विभो अगाध किती तव करणी
मन चिंतुनि हो रत चरणी ॥

चांदवा नभाचा केला । रविचंद्र लटकती त्याला
जणू झुंबर सुबक छताला । मग अंथरली ही धरणी ॥

बाहुली मनुष्ये केली । त्या अनेक रूपे दिधली
परि सूत्रें त्याची सगळी । नाचविसी हरती धरूनी ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
स्वर-
राग - झिंझोटी, खमाज
चाल-चलो गंदेरी हार
गीत प्रकार - नाट्यगीत
  
टीप -
• नांदी.
विभू - बलाढ्य, महान.

 

Print option will come back soon