A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही अनादि संस्कृती

ही अनादि संस्कृती ही अनंत भारती
रोज अरुण चंद्रमा आरतीस उगवती

धरूनि छत्र-सावली मायभूमिच्या शिरीं
हा युगे युगे उभा अचलराज हिमगिरी
चरणिं अर्घ्य द्यावया सिंधुलहरी उसळती

या पवित्र भूवरी राम-कृष्ण जन्मले
वेद हो‍उनी इथे मूर्त ज्ञान प्रकटले
भास-व्यास-वाल्मिकी कवि इथेच निपजती

शब्द स्वप्‍नीही दिला तरीही तो ठरो खरा
म्हणुनी राव रंक हो, ही इथे परंपरा
पितृवचन पाळण्या विजनवासी रघुपती

अधरी आमुच्या सदा मंत्र शांतीचा असे
कधीही मानवासवे वैर आमुचे नसे
अंतरात अस्मिता परि सदैव जागती
अधर - ओठ.
अर्घ्य - पूजा / सन्मान.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
अस्मिता - स्वत्व, स्वाभिमान.
रंक - भिकारी / गरीब.
विजन - ओसाड, निर्जन.
सिंधु - समुद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  आकाशवाणी गायकवृंद, गोविंद पोवळे, सीमा चंद्रगुप्‍त