नको रे दावू कृष्णवदन मज कदा
प्रिय जरी मजला वर्ण सावळा
पाहीन ना कधी तुज घननीळा
कॄष्णवर्ण हा केशभार गे बघवेना नयना
नकोच नेत्री काजळ आता, नको कृष्णवसना
थांब सखे बघ हसते लोचनी कोणाची प्रतिमा
काय करू गे लपला नयनी श्यामल नंदकुमार
जा जा ग सखी, घेउनी ये घननीळा
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | श्रीधर पार्सेकर |
स्वर | - | पु. ल. देशपांडे |
चित्रपट | - | कुबेर |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
पिसे | - | वेड. |
याच वर्षी 'आशीर्वाद' मध्ये काम करणार्या उषा मराठे (उषा किरण) या मुलीचे वडील फिल्म कंपनी काढण्याच्या विचाराने माझ्याकडे आले. त्यांचा उद्देश मुख्यतः त्यांच्या दोघी मुलींना पुढे आणणे हा होता. परंतु ते करणे त्यांना एकट्यांना शक्य नसल्यामुळे 'नाट्य-निकेतन' मधल्या नटांना घेऊनच एक चित्रपट काढावा व त्यात त्यांच्या दोघी मुलींना (उषा मराठे, लीला मराठे) भूमिका मिळाव्यात, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे ४-६ महिने कष्ट करून आम्ही १९४६ साली 'कुबेर' नावाचा मराठी चित्रपट प्रभात स्टुडिओत तयार केला. पुण्यात तो सतत १३ आठवडे चालला आणि १४ व्या आठवड्याला महात्मा गांधींच्या हत्येमुळे जो दंगा झाला त्यावेळी थिएटरांतून काढून घ्यावा लागला.
(संपादित)
मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' या मो. ग. रांगणेकर यांच्या पुस्तकातून. लेखन सहकार्य जयवंत दळवी.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्, पुणे
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.