A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जा उडुनी जा पाखरा

जा उडुनी जा पाखरा
नयनमनोहर पाहुनि परिसर भुलू नको रे जरा

चंचल खग हे पंख पसरुनी आक्रमिती अंबरा
स्वातंत्र्याची मंगल गीते गात चालले घरा
तूही उडूनी जा पाखरा

दिशा दिशा या गुलाल उधळित करिती सण साजरा
रविकिरणांनी आज उजळला गगनाचा उंबरा
जा जा सोडुनी ह्या तरुवरा
खग - पक्षी.
तरुवर - तरू / झाड.
ही एक सुंदर, सुशिक्षित चेटकिणीची प्रेमकथा ! मराठी रंगभूमीवर अद्यापी न रुजलेल्या विषयांपैकी हा एक. त्या दृष्टीने हे धाडसच !

एका पाश्चात्य नाट्यकृतीचा या मराठी कृतीला काही प्रमाणात आधार लाभला आहे.
(संपादित)

पुरुषोत्तम दारव्हेकर
'नयन तुझे जादुगार' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख