A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जाऊं देवाचिया गांवां

जाऊं देवाचिया गांवां ।
घेऊ तेथेचि विसांवा ॥१॥

देवा सांगों सुखदुःख ।
देव निवारील भूक ॥२॥

घालूं देवासीच भार ।
देव सुखाचा सागर ॥३॥

राहों जवळी देवापाशीं
आतां जडोनि पायांशी ॥४॥

तुका ह्मणे आह्मी बाळें
या देवाचीं लडिवाळें ॥५॥
गीत - संत तुकाराम
संगीत - अण्णा जोशी
स्वराविष्कार- उषा मंगेशकर
विठ्ठल शिंदे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- उषा मंगेशकर, संगीत- अण्णा जोशी.
• स्वर- विठ्ठल शिंदे, संगीत- ???.
भावार्थ-

  • आपण सगळे देवाच्या गावाला जाऊ या. देव आपल्याला तेथे भरपूर विश्रांती देईल.
  • आपली जी सुखदु:खे आहेत, अडचणी आहेत, ते सगळे आपण देवाला सांगू.
  • देव सगळ्या गोष्टींचे निवारण करील. तहान-भूक दूर करील.
  • आपला देव हा प्रत्यक्ष सुखाचा समुद्र आहे. त्या देवावर भार घातला की झाले. सगळे सुख मिळाले.
  • आपण देवाजवळ रहायचे आणि त्याच्या पायांची सेवा करायची.
  • तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवाची लाडकी बाळे आहोत.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  उषा मंगेशकर
  विठ्ठल शिंदे