A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयतु शौर्यशालिनी

जयतु शौर्यशालिनी जयतु पुण्यदायिनी
जयतु जयतु जयतु जगति भरतभूमि मानिनी

सात गगनमंडळात नौबती निनादतात
समरसज्‍ज व्हा क्षणांत दशदिशा बजावतात
जय स्वतंत्र लोकतंत्र वीरमंत्र गात गात
लाख वादळांसमान उतरती दळे रणांत
साभिमान तळपुनी सांगतात संगिनी
जयतु जयतु जयतु जगति भरतभूमि मानिनी

रक्त जोवरी नसांत प्राण जोवरी उरात
भावशक्ति माणसात प्राणदेह पंजरात
मायभूमी रक्षणार्थ झुंज धुंद संगरात
या आशा उफाळतात लाख उर्मी अंतरात
धडकली पुरी बिनी भडकल्या कडाबीनी
जयतु जयतु जयतु जगति भरतभूमि मानिनी
कडाबीन - रुंद तोंडाची आखूड बंदूक.
नौबत - मोठा नगारा.
पंजर - पिंजरा.
बिनी - सैन्याची आघाडी.
संगर - युद्ध.
संगीन - व्यवस्थित / मजबूत, पक्का / बंदुकीच्या अग्रभागी लावण्याचे सुर्‍यासारखे शस्‍त्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.