जीवन त्यांना कळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
मीपण ज्यांचें पक्व फळापरी सहजपणाने गळलें हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचें, गेलें तेथें मिळलें हो
चराचराचें होउनि जीवन स्नेहासम पाजळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्कालीं अन् दीनांवर घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळलें हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रें मोहित होऊन जळलें हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुललें अन् परिमळलें हो

गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | रवींद्र साठे, अंजली मराठे, अनुराधा मराठे |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- १७ सप्टेंबर १९४७ |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
उजवाड | - | उजेड. |
तुळा(ला) | - | वजन काटा. |
दुरित | - | पाप. |
सनातन | - | शाश्वत, चिरकाल. |
सायास | - | विषेष आयास (कष्ट), श्रम. |
सिंधु | - | समुद्र. |
Print option will come back soon