कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा
परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा
परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके |
चित्रपट | - | झाला महार पंढरीनाथ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |
टीप - • कर्नाटकातील संत पुरंदरदास विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्या प्रत्येक पदाचा शेवट 'पुरंदरविठ्ठला' या शब्दाने होतो. त्यांच्या भक्तीची प्रतिमा म्हणून 'पुरंदराचा हा परमात्मा', असे संबोधले आहे. पंढरपूरपासून कर्नाटकची सीमा जवळ आहे. सीमेपलीकडील उत्तर कर्नाटकमध्येसुद्धा वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने आढळतो. 'विठोबा','पांडुरंग' ही नावे तिकडे सर्रास ठेवली जातात. - सुमित्र माडगूळकर |
अंतपार | - | अखेरची मर्यादा. |
कटि | - | कंबर. |
कानडा | - | वेडावाकडा / दुर्बोध / कर्नाटकी / एक राग. |
ठाकणे, ठाके | - | थांबणे / स्थिर होणे. |
सावयव | - | मूर्त. |
Print option will come back soon