केव्हातरी पहाटे उलटून
केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात गेली !
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात गेली !
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर ∙ आशा भोसले ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | निवडूंग |
राग | - | दुर्गा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे, नयनांच्या कोंदणी |
टीप - • स्वर- पद्मजा फेणाणी-जोगळेकर, चित्रपट- निवडूंग. |