A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
किती पांडुरंगा वाहू

किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार?
लक्ष चौर्‍यायशीची ही नको आता येरझार

लोखंडाचे गुणदोष बघे का परीस?
लेकराची कासावीस माहीत आईस !

पाण्यामाजी तूच देवा तारिले पाषाण
ब्रीद तुझे दीनानाथा, पतितपावन !

काकुळती आलो आता नको बघु अंत

कोठे गुंतलासी राया कोणाला ताराया?
पंढरीच्या राया तुझ्या दंडवत पाया !
परीस - स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा दगड.
ब्रीद - प्रतिज्ञा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.