A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कृष्ण माझी माता

कृष्ण माझी माता । कृष्ण माझा पिता ।
बहिणी बंधु चुलता । कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू । कृष्ण माझें तारूं ।
उतरी पैलपारू । भवनदीची ॥२॥

कृष्ण माझें मन । कृष्ण माझें जन ।
सोइरा सज्जन । कृष्ण माझा ॥३॥

तुका ह्मणे माझा । श्रीकृष्ण विसावा ।
वाटे न करावा । परता जीवा ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - वसंत देसाई
स्वराविष्कार- पं. उदयराज गोडबोले
मास्टर कृष्णराव
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - प्रीतिसंगम
राग - बागेश्री
गीत प्रकार - हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत, संतवाणी
  
टीप -
• स्वर- उदयराज गोडबोले, संगीत- वसंत देसाई, नाटक- प्रीतिसंगम.
• स्वर- मा. कृष्णराव, संगीत- मा. कृष्णराव.
तारु - नौका.
परता - पलीकडचा.
भव - संसार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. उदयराज गोडबोले
  मास्टर कृष्णराव