A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मजला घडावी हे देवा

मजला घडावी हे देवा तव पदसेवा । सहवास द्यावा ॥

सेवेंत भाग पावतां, सहजा मिळे समता । छंद असा पुरवावा ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
नाटक - सावित्री
राग - जंगला
ताल-कवाली
चाल-विनति हमारी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
साबरमती नदीच्या कांठी एक वर्षाची कारागृहत्रासाची शिक्षा भोगीत असतांना १९२९ सालीं ह्या नाटकांतील गद्यभाग लिहिला असून, 'गंधर्व नाटक मंडळी'च्या मुंबईच्या सांप्रतच्या मुक्कामांत विशेषतः रा. कृष्णराव फुलंबीकर व रा. नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व ह्यांनी चाली दिल्यावर पदे रचण्यांत आली आहेत. पदांच्या चाली दिल्याबद्दल व नाटक बसवितांना फार मेहनत घेतल्याबद्दल 'गंधर्व नाटक मंडळी'चे मानावे तेवढे आभार कमीच होणार आहेत.
(संपादित)

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
दि. ६ मार्च १९३३
'संगीत सावित्री' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- यशवंत कृष्ण खाडिलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.