माझ्या मराठीची गोडी
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची
या रे, या रे अवघे जण, हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची
डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी
मुजर्याची मानकरी वीरांची ही मायबोली
नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची
या रे, या रे अवघे जण, हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची
डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी
मुजर्याची मानकरी वीरांची ही मायबोली
नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर
गीत | - | वि. म. कुलकर्णी |
संगीत | - | कमलाकर भागवत |
स्वर | - | कमलाकर भागवत |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
चोखडी (चोख) | - | शुद्ध / उत्कृष्ट / प्रामाणिक. |
फाळ | - | नांगरास लावायचे लोखंडी पाते. |