A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माणुसकीचे पाईक आम्ही

एक दोन तीन!
माणुसकीचे पाईक आम्ही असे वारसा हा प्राचीन!

सज्जन त्यांचे आम्ही साथी, ब्रीद सांगते निधडी छाती
त्यांच्यासाठी धावुन जाऊ, मरणहि माथा झेलून घेऊ
भला तयाला धरू उराशी उच्‍च असो वा अनाथ दीन!
एक दोन तीन!

माणुसकीचे केवळ लांछन, दुर्जन तो तो अमुचा दुष्मन
निर्भयतेने गर्जत 'हर हर', संगर त्याशी करू भयंकर
दुष्ट तयाचे दमन करावे मार्ग नसे हा अम्हा नवीन!
एक दोन तीन!

एक जाणतो आम्ही प्रीती- तोच वेद, ती गाथा, पोथी;
मंगल पावन प्रीतीसाठी विष हो अमृत अमुच्या ओठी
या प्रीतीच्या चरणांवरती विश्व होतसे अवघे लीन!
एक दोन तीन!
दमन - खोड मोडणे, जिरवणे.
निधड - पराक्रमी.
पाईक - चाकर / पायदळाचा शिपाई.
ब्रीद - प्रतिज्ञा.
लांछन - डाग / कलंक.
संगर - युद्ध.

 

  महेंद्र कपूर, सी. रामचंद्र