A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी गातों नाचतों आनंदें

मी गातों नाचतों आनंदें ।
वेडा झालों मी तव छंदें ॥१॥

गाइन ओविया पंढरीचा हा देव ।
आमुचा तो पांडुरंग ॥२॥

तुका म्हणे माझा सखा पांडुरंग ।
गाइन गोड मी हरिचें गीत ॥३॥
नाटकाच्या संहितेतील या पदाचे संस्करण-

गातों नाचतों आनंदें ।
वेडा झालों मी तव छंदें ॥१॥

गाइन ओविया पंढरीचा देव ।
आमुचा तो जीव पांडुरंग ॥२॥

आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ।
जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥३॥

तुका म्हणे माझा सखा पांडुरंग ।
गाऊं गाऊं गोड हरिचें गीत ॥४॥

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.