नाथ हा माझा मोही खला
नाथ हा माझा मोही खला; शिशुपाला भारी झाला,
वीर रुक्मी शिशुसम आणिला ॥
वीरा लोळवि, मग हळु धरुनी, कर-रत्नाला जणु हा ल्याला ॥
वीर रुक्मी शिशुसम आणिला ॥
वीरा लोळवि, मग हळु धरुनी, कर-रत्नाला जणु हा ल्याला ॥
गीत | - | कृ. प्र. खाडिलकर |
संगीत | - | भास्करबुवा बखले |
स्वराविष्कार | - | ∙ बालगंधर्व ∙ माणिक वर्मा ∙ पं. कुमार गंधर्व ∙ मधुवंती दांडेकर ∙ आशा खाडिलकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | स्वयंवर |
राग | - | यमन |
ताल | - | त्रिवट |
चाल | - | हावरा मोरा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
खल | - | अधम, दुष्ट. |
शिशुपाल | - | श्रीकृष्णाचा मामेभाऊ. रुक्मिणीचा विवाह याच्याशी करावा असा भीष्मकाचा (तिच्या वडिलांचा) बेत होता. |
श्रीरुक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकांत, रसपरिपाकाकरितां आणि श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या चरित्रांतील उदात्त तत्त्वें प्रेक्षकांच्या पुढे प्राधान्येंकरून आणण्याकरितां, कांहीं फेरफार करून हे नाटक रचलेलें आहे.
नाटकांतील चाली प्रि. भास्करबुवा बखले यांजकडून मुख्यतः घेतल्या असून 'गंधर्व नाटक मंडळी'तील रा. रा. बालगंधर्व आदिकरून गायनपटु नटांनीहि ह्या कामी चांगली मदत केली आहे. ह्याबद्दल 'गंधर्व नाटक मंडळी' व प्रि. भागकरबुवा बखले यांचा मी फार आभारी आहें.
फार परिश्रम घेऊन नाटक बसविल्याबद्दल 'गंधर्व नाटक मंडळी'चे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
(संपादित)
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
दि. ४ डिसेंबर १९१६
'संगीत स्वयंवर' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- बलवंत कृष्ण खाडिलकर (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.