A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निळासावळा नाथ तशीही

निळासावळा नाथ, तशी ही निळीसावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात

तुडवुनी वन धुंडुनी नंदनवन
शोधुनी झाले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात

नीलजळी यमुनेच्या साची
होडी सोडिली मी देहाची
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासात
साच - पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.
दिवाळीच्या दिवसात कॅडेल रोडवरील नाटककार ह. वि. देसाईंच्या गच्चीवर मुलांच्या विविध कलादर्शनाचा कार्यक्रम होता. रात्री सात-साडेसातचा सुमार. पण विद्युतप्रवाहात व्यत्यय आल्यामुळे कार्यक्रम रंगत नव्हता. सुलभा कामेरकर (सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. सुलभा देशपांडे) भावपूर्ण स्वरात 'करू देत शृंगार' गीत गात होत्या. लाऊडस्पीकर चालू होई, बंद होई- पण गाण्यात खंड पडला नव्हता. माझं लक्ष मात्र यावेळी सभोवताली दाटून आलेल्या आकाशातील निळ्या ढगांकडे होतं. 'करू देत शृंगार'च्याच वजनावर दोन ओळी ओठातल्या ओठात गुंजू लागल्या. 'निळासावळा नाथ, तशी ही निळीसावळी रात.. कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात..' हा गाण्याचा मुखडा तयार झाला.
(संपादित)

गंगाधर महाम्बरे
सौजन्य- चित्ररंग, दिवाळी अंक (१९६७)

  इतर संदर्भ लेख