पडिलें दूरदेशीं
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं ।
नको हा वियोग कष्ट होताती जिवासि ॥१॥
दिनु तैसी रजनी मज जाली गे माये ।
अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये ॥२॥
गरुडवाहना, गंभीरा येईं गा दातारा ।
बाप रखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥
नको हा वियोग कष्ट होताती जिवासि ॥१॥
दिनु तैसी रजनी मज जाली गे माये ।
अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये ॥२॥
गरुडवाहना, गंभीरा येईं गा दातारा ।
बाप रखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | किशोरी आमोणकर |
स्वराविष्कार | - | ∙ किशोरी आमोणकर ∙ आशा भोसले ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, संतवाणी |
टीप - • स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर. • स्वर- आशा भोसले, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर. |
अवस्था | - | उत्कंठा. |
भावार्थ-
इतर भावार्थ
परमेश्वर दर्शन देत नाही आणि त्याच्या भेटीची तर तळमळ लागून राहिली आहे अशी भावस्थिती ज्ञानेश्वरांच्या या अभंगांमधून प्रकट होते.
परमेश्वरापासून आपण दूर पडलो आहोत आणि वियोगामुळे सारा जीव पोखरून निघत आहे. परमेश्वरानेच आपाल्याला असे वेडे केले आणि अजून येत नाही. त्यामुळे दिवसही काळोख होऊन गेला. तेव्हा परमेश्वरा, लवकर दर्शन दे.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे

Print option will come back soon