पसरलें विश्व अपार पहा ॥
भेदुनि गगनाला । बघुनि ये देवलोक सारा ।
पिउनि अमृत, घेउनि संचित । परतुनि ये घरा ॥
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | श्रीधर पार्सेकर |
स्वराविष्कार | - | ∙ पु. ल. देशपांडे ∙ अर्चना कान्हेरे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | वहिनी |
राग | - | नंद |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
संचित | - | पूर्वजन्मीचे पापपुण्य. |
या नाटकातली आणखी एक स्मरणात राहणारी भूमिका मामा पेंडसे यांची विष्णुपंतांची. सहा मुली पाठीशी असलेल्या दरिद्री बापाची करुण भूमिका ते एवढ्या तन्मयतेने करीत, की त्यांच्यापुढे इतर पात्रांचा टिकाव लागणे अवघड होई. या नाटकाला साहित्यदृष्ट्या आणि नाट्यदृष्ट्या टीकाकार बराच वरचा अनुक्रम देतात. परंतु आर्थिकदृष्ट्या हे नाटक कंपनीला फारसा हातभार लावू शकले नाही, हेही तितकेच खरे. अमुक एक नाटक प्रेक्षकांच्या मनाची पकड का घेते, आणि दुसरे एखादे नाटक का घेत नाही, हे न उलगडणारे एक कोडे आहे. 'वहिनी' नाटकाच्या वेळी याची प्रथम जाणीव झाली.
'माझे घर' व 'वहिनी' या नाटकांसाठी कै. श्रीधर पार्सेकर यांची संगीत दिग्दर्शक म्हणून योजना करण्यात आली होती. दोन्ही नाटकांना त्यांनी श्रवणमधुर चाली दिल्या होत्या. 'माझे घर' नाटकातील 'हासता खेळता' आणि 'वहिनी' नाटकातील 'पाखरा जा' ही दोन गाणी अजून कित्येक प्रेक्षकांच्या अंतःकरणात गुंजारव करीत असतील. याच नाटकापासून कै. पार्सेकरांनी निरनिराळ्या स्वरांच्या घंटा आणवून त्यांच्या सहाय्याने नाटकाच्या नमनाचे वाद्यसंगीत तयार केले होते. ते सर्व नाटकांच्या आरंभी, तिसर्या घंटेऐवजी, वाजविण्यात येई.
(संपादित)
मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' या मो. ग. रांगणेकर यांच्या पुस्तकातून. लेखन सहकार्य जयवंत दळवी.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्, पुणे
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.