सजिवपणीं घडती सारे । मरण-भोग त्याला ॥
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥
सौख्य-भोग इतरां सारे । कष्ट मात्र त्याला ॥
मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥
गीत | - | वीर वामनराव जोशी |
संगीत | - | वझेबुवा |
स्वराविष्कार | - | ∙ मास्टर दीनानाथ ∙ आशा भोसले ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | रणदुंदुभि |
राग | - | पिलू |
चाल | - | अब छोडोना पराई कान्हा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
एकदा शिमल्यामध्ये इंग्रज गव्हर्नरसमोर त्यांना मैफील करायला बोलावलं गेलं. बाबा सुरुवातीला रागदारी गायले आणि मग एकदम काही कल्पना न देता 'रणदुंदुभी' मधलं 'परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला' हे गाणं सुरू केलं. इंग्रजी सत्तेच्या काळात त्यांच्या गव्हर्नरसमोर हे गाणं म्हणणं म्हणजे जिवावरचं धाडस. सारेच जण चपापले; पण बाबा चढ्या आवाजात दुभाष्याला म्हणाले “या गाण्याचा अर्थ तुझ्या गव्हर्नर साहेबाला त्याच्याच भाषेत समजावून सांग; म्हणजे आम्हां पारतंत्र्यात असलेल्यांच्या भावना त्याला कळतील..."
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' या पुस्तकातून.
शब्दांकन- प्रवीण जोशी
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.