परदेशी सजण घरी आले
परदेशी सजण घरी आले
देहताप सरले, सुखमय मी मंगल गीत म्हणाले
मोर जसा घनगर्जन श्रवुनी, तैसी उन्मन झाले
प्रभुमीलन होताच क्षणीं त्या, सारे दु:ख गळाले
चंद्र बघुनि जशि फुले कुमुदिनी, तैसी फुलुनी गेले
नसानसांत भरे शितलता, महालात हरि आले
सगळ्या भक्तांचे कैवारी ते प्रभुचरण मिळाले
मीरा विरहिणी शीतल झाली, द्वंद्वच पार निमाले

गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | जानकी अय्यर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
उन्मनी | - | देहाची मनरहित अवस्था. |
कुमुदिनी | - | श्वेतकमळाची वेल. |