A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पतितपावन नाम ऐकुनी

पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा

घेसी जेव्हा देसी ऐसा असशी उदार
काय देवा रोधु तुमचे कृपाणाचे द्वार
सोडी ब्रिद देवा आता न होसी अभिमानी
पतित पावन नाम तुजला ठेवियले कोणी

हाति घेउनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतित पावन नव्हेसी हरी तू अति मोठा घातकी
नामा ह्मणे देवा तुझे न लगे मज काही
प्रेम असु द्या हृदयी तुमचे आठवण पायी

 

Print option will come back soon