A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पावलों पंढरी वैकुंठभुवन

पावलों पंढरी वैकुंठभुवन ।
धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥

पावलों पंढरी आनंदगजरें ।
वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥

पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं ।
संत या सज्जनीं निवविलों ॥३॥

पावलों पंढरी पार नाहीं सुखा ।
भेटला हा सखा मायबाप ॥४॥

पावलों पंढरी येरझार खुंटली ।
माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥

पावलों पंढरी आपुले माहेर ।
नाहीं संवसार तुका ह्मणे ॥६॥
क्षेम - आलिंगन, गळाभेट.
भेर - मोठा नगारा. नौबत.
वोळणे - वळणे (दिशा बद्लून जवळ येणे.) / प्राप्‍त होणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.