A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पावनेर ग मायेला करू

वाट दंवानं भिजून गेली
उन्हं दारात सोन्याची झाली
मायभवानी पावनी आली
पावनेर ग मायेला करू
ओटी आईची मोत्यानं भरू !

माय अंबिका माय भवानी
रूपदेखणी गुणाची खाणी
शंभूराजाची लाडकी राणी
माझी पायरी लागे उतरू
ओटी आईची मोत्यानं भरू !

सुखी नांदते संसारी बाई
न्हाई मागणं आणिक काई
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू
ओटी आईची मोत्यानं भरू !
पावनेर - पाहुणेर, आतिथ्य.
पावनी - पाहुणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.