प्रभु या हो
प्रभु या हो, प्रभु या हो
अष्टभाव-सुमनांची माझ्या
मंगलपूजा घ्या हो
पतित पराजित जीवन माझे
पेलवे न हे अपार ओझे
करांगुलीने भार उतरवा
पैलतिरी मज न्या हो
त्रिविध ताप मज अतीव छळिती
लवहि न शांती, लवहि न तृप्ती
करुणेच्या मज शीतल धारा
पाजुनि थारा द्या हो
मीपण माझे प्रभुजी हरवा
चरणी द्यावा नित्य विसावा
चिदानंद बहरवा, फुलावा
आनंदाचा लाहो
अष्टभाव-सुमनांची माझ्या
मंगलपूजा घ्या हो
पतित पराजित जीवन माझे
पेलवे न हे अपार ओझे
करांगुलीने भार उतरवा
पैलतिरी मज न्या हो
त्रिविध ताप मज अतीव छळिती
लवहि न शांती, लवहि न तृप्ती
करुणेच्या मज शीतल धारा
पाजुनि थारा द्या हो
मीपण माझे प्रभुजी हरवा
चरणी द्यावा नित्य विसावा
चिदानंद बहरवा, फुलावा
आनंदाचा लाहो
| गीत | - | कवी सुधांशु |
| संगीत | - | राम फाटक |
| स्वर | - | कुमुद कुलकर्णी |
| गीत प्रकार | - | भक्तीगीत |
| लव | - | सूक्ष्म. |
| लाहणे | - | लाभणे, मिळणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












कुमुद कुलकर्णी