दृष्ट्वा यस्याननेन्दुं भवति वपुरिदं चंद्रकान्तानुकारि
तस्मिन्नागत्य कण्ठग्रहनिकटपदस्थायिनि प्राणनाथे
भग्ना मानस्य चिन्ता भवति मम पुनर्वज्रमय्या: कथंचित् ॥
प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा
प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया
तव न जाने न जाने हृदयं मम
पुन: कामो दिवापि रात्रिमपि ।
निर्घृण तपति बलीयस्त्वयि
वृत्तमनोरथाया अङ्गानि ॥
प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा
प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया
इदमनन्यपरायणमन्यथा हृदयसन्निहिते हृदयं मम ।
यदि समर्थयसे मदिरेक्षणे मदनबाणहतोऽस्मि हत: पुन: ॥
हे प्रिया हे प्रिये हे प्रिया: सुंदरि
श्रुत्वा नाम प्रियस्य स्फुटघनपुलकं जायते यत्समन्तात
तस्मिन्नागत्य कंठग्रहनिकटपदस्थायिनि प्राणनाथे
भग्ना मानस्य चिन्ता भवति मम पुनर्वज्रमय्या: कथंचित् ॥
प्रेयसी प्रेयसौ प्रेयस्य: प्रथमा
प्रेयसीं प्रेयसौ प्रेयसी: अद्वितीया
प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा
प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया
गीत | - | |
संगीत | - | हृषिकेश-सौरभ-जसराज |
स्वर | - | स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर |
चित्रपट | - | YZ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
या गीताचे शब्द नवव्या शतकातील संस्कृत कवि अमरु यांच्या अमरुशतकम् या रचनेतील श्लोक-
श्रुत्वा नामापि यस्य स्फुटघनपुलकं जायतेऽङ्गं समन्तात्
दृष्ट्वा यस्याननेन्दुं भवति वपुरिदं चन्द्रकान्तानुकारि ।
तस्मिन्नागत्य कण्ठग्रहणसरभसस्थायिनि प्राणनाथे
भग्ना मानस्य चिन्ता भवति मम प्नर्वज्रमय्याः कदा नु ॥५७॥
आणि कालिदासांच्या अभिज्ञानशाकुन्तलम् या नाटकातील (अंक ३)-
शकुंतलेच्या तोंडी असलेल्या-
तव न जाने हृदयं मन पुनः कामो दिवापि रात्रावपि ।
निर्घृणं तपति बलीयस्त्वयि वृत्तमनोरयान्यङ्गानि ॥
तसेच राजा दुष्यन्तच्या तोंडी असलेल्या-
इदमनन्यपरायणमन्यथा हृदयसंनिहिते हदयं मम ।
यादि समथेयसे मदिरेक्षणे मदनबाणहतोऽस्मि हतः पुनः ॥
यांवर आधारित आहेत.
श्रुत्वा नाम प्रियस्य स्फुटघनपुलकं जायते यत्समन्तात
दृष्ट्वा यस्याननेन्दुं भवति वपुरिदं चंद्रकान्तानुकारि
तस्मिन्नागत्य कण्ठग्रहनिकटपदस्थायिनि प्राणनाथे
भग्ना मानस्य चिन्ता भवति मम पुनर्वज्रमय्या: कथंचित् ॥ ५९ ॥
(छंद- स्रग्धरा)
ज्याचं नाव कानी आलं तरी अंगांगावर रोमांच उठतात.. ज्याचा मुखचन्द्र पाहिला की सारं शरीर चंद्रकांत मण्यासारखं द्रवू लागतं.. तो प्राणेश्वर येतो, मला घट्ट आलिंगन देतो (आणि मी पुरती त्याच्या अधीन होते).. तरीपण, माझ्या वज्रासारख्या कठोर मनात पुन्हा कधीतरी तो मान जन्म घेईल अशी दुष्ट चिंता वाटतेच.
आपल्या प्रियाच्या अनुनयाला झिडकारून नंतर हळहळणारी ही नायिका. तिची सखी तिची निर्भत्सना करून, 'असं तू का वागतेस ?' म्हणून विचारते. तेव्हा नायिका उत्तर देते की जरी माझं त्याच्यावर नितान्त प्रेम आहे तरी माझ्यातला ईर्ष्यामान कसा काय मधेच जागृत होतो ते कळत नाही.
पाण्डवगीतेमधला दुर्योधन जसं म्हणतो 'केनापि देवेन हृदि स्थितेन यथा प्रयुक्तोस्मि तथा करोमि ।' अर्थात, माझा हृदयस्थ देव जसं मला सांगेल तसं मी वागतो. तशीच तिची परवश अवस्था असावी. 'मूळ स्वभाव जाईना, तिचा येळकोट राहीना !'
इथे औत्सुक्य, हर्ष, अनुराग, चिंता इत्यादि अनेक भाव एकत्र आले आहेत. हा श्लोक प्रक्षिप्त आहे असं अर्जुनदेव म्हणतो. परंतु त्याच्यातील भाव एकंदर कवितेशी अनुकूल असल्यानं त्याचा अंतर्भाव केला पाहिजे असंही त्याचं मत आहे.
एकंदरीत, प्रीतीच्या खेळात दूरभिमान हा प्रेमिकांचा वैरी असतो हे अमरूला निश्चित सांगायचं आहे.
(संपादित)
डॉ. लिली जोशी
अमरुची प्रेमकविता- अनुवाद व रसग्रहण
सौजन्य- उन्मेष प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.