A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिये ये निघोनी (२)

नको ओढ लावून घेऊ उन्हाची
जसे पारधी हे तसे तीर टोची!
पिसांमागुनी गे पिसे दग्ध होती
भरारी पडे मृत्तीकेशीच अंती!!

तसे ऊन्ह मार्गात होतेच माझ्या
पदांशी भूमी तप्त होतीच माझ्या
परंतु तुझे हात हातात आले
व्यथांचे तळे गा नीळेशार झाले!

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची..
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची!

फुला या उन्हाचा तुला ठाव नाही
बरे तप्तदेशी तुझा गाव नाही!
म्हणोनि तुझे ओठ गातात ओले
तुझ्या नेत्री निष्पापता घेई झोले

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे..
गीत- संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर - सलील कुलकर्णी , संदीप खरे
अल्बम- सांग सख्या रे
गीत प्रकार - कविता
झोला - झोका.
दग्ध - जळालेले, होरपळलेले.
मृत्तिका - माती.

 

  सलील कुलकर्णी, संदीप खरे