A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रमवि नयनां

रमवि नयनां । ही प्रभुलीला
अमरकृतिला । त्या तुलना ना ॥

जादुगार चतुर भासला
रमवी भुलवी । सहज ते भुवना ॥
स्वतःचे दोन शब्द

माझे विद्यागुरु प्रो. गोविंद चिमणाजी भाटे यांनी माझ्या विनंतीस मान देऊन प्रस्तुत नाटकास प्रस्तावना लिहिण्याची कृपा केली याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहें. प्रो. दादासाहेब भाटे, त्याचप्रमाणें येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधील बहुतेक सर्व सन्मान्य सभासद यांची माझ्यावर जी कृपादृष्टि आहे तीबद्दल मी सर्वांचा ऋणी आहें. हें येथें व्यक्त केल्यावांचून रहावत नाहीं. त्याचप्रमाणे माझ्या अनेक मित्रांनीं नाटक लिहिते वेळीं व पुढें टीकाकारांनीं ज्या अनेक सूचना केल्या, त्यांबद्दल कृतज्ञता प्रदर्शित करणेंही जरूरीचें आहे. या उदार साह्यदात्यांचे या कार्मी इतकें साह्य झालें आहे की, तें वजा जातां, नाटक लिहिण्याची अनिवार हौस व ती न भागवितां येण्याजोगी आत्मसिद्धि यांखेरीज माझ्या वांट्यास कांहींच उरणार नाहीं. माझ्या पुढील लेखनात्मक प्रयत्‍नांचे वेळींही या सर्वाचें असेंच साह्य मिळेल, अशी मला मोठी आशा आहे.
(संपादित)

राम गणेश गडकरी
दि. २५ मे १९१३,
'प्रेमसंन्यास' या नाटकाच्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे पुराणिक आणि मंडळी, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.