रे हिंदबांधवा थांब या स्थळीं
रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणुं जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली!
घोड्यावर खंद्या स्वार,
हातांत नंगि तर्वार,
खणखणा करित ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली.
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंचीं लष्करें थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली!
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरू, झरे ढाळतिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळीं!
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणुं जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली!
घोड्यावर खंद्या स्वार,
हातांत नंगि तर्वार,
खणखणा करित ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली.
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंचीं लष्करें थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली!
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरू, झरे ढाळतिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळीं!
गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- १९२९ साल. • झांशीच्या राणीचे स्मारक ग्वाल्हेरच्या किल्ल्याखाली बांधले आहे. त्यावर खोदण्यासाठी प्रस्तुत कविता कवि भा. रा. तांबे यांनी रचली. |
इतिश्री | - | समाप्ती. |
नीर | - | पाणी. |