A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सजण दारी उभा

सजण दारी उभा, काय आता करू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?

मी न केली सखे, अजून वेणीफणी,
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी;
राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू?

मी न दुबळी कुडी अजून शृंगारिली
मी न सगळीच ही आसवे माळिली,
प्राणपूजा न मी अजूनही बांधिली;
काय दारातुनी परत मागे फिरू?

बघ पुन्हा वाजली थाप दारावरी :
हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी;
तीच मी राधिका ! तोच हा श्रीहरी !
हृदय माझे कसे मीच हृदयी धरू?
गीत - सुरेश भट
संगीत - यशवंत देव
स्वर-
गीत प्रकार - भावगीत

 

Print option will come back soon