A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखे बाई ग येण्याचा वखत

कुठवर पाहु वाट सख्याची,
माथ्यावर चंद्र की ग ढळला !
सखे बाई ग, येण्याचा वखत की ग टळला !

घाईघाईनं इकडे येत असेल मजकडे
कुणा ग सटवाईचा, सवतीचा निरोप कळला आधी
सखे बाई ग दिली थाप मजलागी,
येण्याचा वखत की ग टळला !

तळहात धरून भरविली साय
होई आता हाय हाय !
सभोवताली जाळ केली माझी राळ
सखे बाई ग जीव तळमळे,
येण्याचा वखत की ग टळला !

 

Print option will come back soon