A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखे शशिवदने

सखे शशिवदने ।
किती रुचिर, बिंबसम अधर, परम सुकुमार ॥

अधरसुधा तव पिउनी कसें गे ।
अयशोविष मी सेविन सांगे ।
विधुकरशुचिरदने ॥
अधर - ओठ.
अयशो - अपकीर्त (अयशस्- दुष्कीर्ति).
रुचिर - मोहक, सुंदर.
रदन - दात.
विधु - चंद्र.
शुचि - शुद्ध, पवित्र, स्वच्छ.
शशी - चंद्र.
सुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पं. जितेंद्र अभिषेकी