आनंदानें बहरे त्रिभुवन
आनंदानें नटलें जीवन
आनंदचि जणुं ल्याला अभिनव
आनंदाचें लेणें
दु:ख धरेचें फेडायाला
गोकुळिं आला बाळ चिमुकला
रूप लेउनी त्रिभुवनसुंदर
राजस गोजिरवाणें
गीत | - | गो. नि. दांडेकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | राधामाई |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, हे श्यामसुंदर |
धाले | - | (धालेपण) तृप्ती. |
राजस | - | सुंदर / रजोगुणी. |
लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |
मे महिन्यात श्रीमंत रसिक मंडळी महाबळेश्वरला हवेसाठी जात, त्याचा फायदा घेण्यासाठी त्या वर्षी आम्ही तेथे कच्चे थिएटर बांधून चारपाच प्रयोग केले. पण कधी नव्हती ती पावसाची झिमझिम तेथे मे महिन्याच्या मध्यापूर्वी सुरू झाली आणि महाबळेश्वरला हवेसाठी आलेली नाजुक श्रीमंत मंडळी त्या 'ओपन एअर थिएटर'त येण्यास कांकू करू लागली. त्यामुळे कच्चे थिएटर का होईना, पण ते बांधण्यासाठी पुण्याहून सामान नेण्याआणण्याचा जादा खर्च बोकांडी बसला आणि नुकसानीत आणखी भर पडली.
(संपादित)
मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' या मो. ग. रांगणेकर यांच्या पुस्तकातून. लेखन सहकार्य जयवंत दळवी.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्, पुणे
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.