संपले जीवन संपली
संपले जीवन, संपली ही गाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
उधळला डाव माझा मीच हाती
धावलो उगाच मृगजळापाठी
उपेक्षित दारी, तुझ्या जगन्नाथा
चुकलो-माकलो नको राग देवा
लेकरू अजाण, तूच हात द्यावा
पडो देह माझा, तुझे गुण गाता
नको जिणे झाले, मिटु दे हे प्राण
तुझे तूच देवा घेऊनि जा दान
चित्त लागले रे पैलतीरी आता
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
उधळला डाव माझा मीच हाती
धावलो उगाच मृगजळापाठी
उपेक्षित दारी, तुझ्या जगन्नाथा
चुकलो-माकलो नको राग देवा
लेकरू अजाण, तूच हात द्यावा
पडो देह माझा, तुझे गुण गाता
नको जिणे झाले, मिटु दे हे प्राण
तुझे तूच देवा घेऊनि जा दान
चित्त लागले रे पैलतीरी आता
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
चित्रपट | - | पतिव्रता |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
मृगजळ | - | आभास. |