A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सर सुखाची श्रावणी

गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे, थांब ना
हूल की चाहूल तू इतके कळू दे, थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ मग वाटे नवा

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

बावर्‍या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता उन्हाच्या उंबर्‍याशी चांदवा
उंबर्‍यापाशी उन्हाच्या चांदवा

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा