नच एकान्तीं सोडी नाथा । भेटूं न दे हृदयाला ॥
गीत | - | कृ. प्र. खाडिलकर |
संगीत | - | गोविंदराव टेंबे |
स्वराविष्कार | - | ∙ निर्मला गोगटे ∙ जयमाला शिलेदार ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | मानापमान |
राग / आधार राग | - | जिल्हा |
ताल | - | दादरा |
चाल | - | दर्सन मै ना भई |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
संगीत रंगभूमीवर अनेक चढउतार जरी आले तरी आपण जर आढावा घेतला तर कुठल्या न कुठल्या स्वरुपात संगीत रंगभूमीवर होतंच. आणि याचं कारण मला वाटतं त्याकाळी मनोरंजनाची साधनं काही नव्हती आणि लोकांना संगीत आवडत होतं.
याच सुमारास तीन भीष्माचार्य - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, भास्करबुवा बखले आणि रामकृष्णबुवा वझे हे अपार कष्ट करून उत्तर हिंदुस्थानातून अभिजात संगीत शिकून आले. मराठी संगीत नाटक मंडळी इतकी चतुर होती की त्यांनी या तिघांना आपले गुरु केले. 'गंधर्व नाटक मंडळी'त बखलेबुवा आले, 'ललितकलादर्श'मध्ये वझेबुवा राहिले आणि 'डोंगरे नाटक मंडळी'त बाळकृष्णबुवा आले.
याचा परिणाम असा झाला, की अभिजात शास्त्रीय संगीत हे रंगभूमीच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलं. कारण ते पूर्वी फक्त दरबारात किंवा कोठीवर ऐकलं जाई. परिणामी अभिजात संगीतात जी चार मोठी घराणी आहेत- 'किरणा', 'आग्रा', 'ग्वाल्हेर' आणि 'जयपूर', या घराण्यांच्या गायकांची गायकी रंगभूमीवरून अनेकांच्या गळ्यातून ऐकली गेली. ती निरनिराळी सांगता येईल.
भालचंद्रबुवा पेंढारकर, मा.दामले, भार्गवराम आचरेकर वझेबुवांची गायकी गात असत, म्हणजे ग्वाल्हेर घराण्याची.
छोटा गंधर्वांनी तर सात गुरु केले आणि स्वतःच्या आवाजाला अनुकूल अशी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली.
पं. राम मराठे, भास्करबुवा आणि मास्टर कृष्णरावांच्या परंपरेतले.
या सर्वांचे आदर्श बालगंधर्व. सर्वांनी त्यांचं गाणं मनसोक्त ऐकलं पण त्याचं अनुकरण केलं नाही. हीच प्रत्येक गायकीची आणि प्रत्येक गळ्याची विविधता प्रेक्षकांना आकर्षित करत आली आहे, असं मला वाटतं.
(संपादित)
निर्मला गोगटे
संगीत रंगभूमीचा मागोवा- स्वरनाट्य रसगंगा (अर्चना साने, यशश्री पुणेकर)
शतकोत्तर रौप्य महोत्सव, विशेष प्रकाशन
सौजन्य- भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.