A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शांत सागरी कशास

शांत सागरी कशास
उठविलीस वादळे
गायिले तुवा कशास
गीत मन्मनातले

काय हे तुझ्यामुळे
देहभान हरपले
युगसमान भासतात
आज नाचरी पळे

अमृतमधुर बोल एक
श्रवणी जो न पाडिलास
अधिरता भरे जिवात
केवढी तयामुळे

स्वर्ग कल्पनेतला
येईल कधी भूतला
दिवसरात्र अंतरात
आस ही उचंबळे
आसवणे - आतुर, उत्सुक, आशायुक्त.