A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शर लागला तुझा गे

शर लागला तुझा गे,
बघ जीव झाला वेडापिसा । हा ॥

नको अशी तरि राहूं दूर ।
बाहुपाशिं सौख्यसार । मृदुलशा ॥

जडे गडे तव ठायीं आस ।
देइं गोड चुंबनास । मधुरशा ॥
गीत - ना. वि. कुलकर्णी
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर- रामदास कामत
नाटक - संत कान्होपात्रा
राग - बहार
ताल-त्रिवट
चाल-तूतु बाहु दे सवा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
ठाय - स्थान, ठिकाण.
शर - बाण.
रसिकांचे सेवेशी-

प्रख्यात 'गंधर्व नाटक मंडळी' चे मालक, गायन व अभिनयसम्राट नट श्री. नारायणराव राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' यांनी नाटक लिहिण्याविषयीं मला आज्ञा केली; त्या आज्ञेला अनुसरून मी प्रस्तुत 'संत कान्होपात्रा' नाटक लिहिलें.

सदरहू नाटकाकरितां कान्होपात्रेची जी चरित्रविषयक माहिती मिळवितां आली, ती अशी-

प्रो. आर्. डी. रानडे, एम्. ए., संपादित 'अध्यात्म-ग्रंथमाले'चा ग्रंथांक २, संतवचनामृत, या भागास जोडलेल्या विद्वत्ताप्रचुर प्रस्तावनेंत कान्होपात्रेच्या चरित्राची सारांशरूप दिलेली पुढील माहिती-
"कान्होपात्रा ही मंगळवेढें येथील शामा नांवाच्या एका दासीची मुलगी. ती फार सुंदर असल्यानें आपल्या योग्यतेनुरूप ज्याचें रूप असेल त्यास तिनें वरण्याचा निश्चय केला होता. विठ्ठलाखेरीज तिची प्रीति दुसर्‍यावर जाईना. बेदरच्या बादशहानें आपल्या राजगृहांत तिला सक्तीने बोलावले असतां त्यांजकडे जाण्यापेक्षां मृत्यु बरा असें वाटून तिनें पंढरपुरास विठ्ठलासमोरच देह ठेविला.
ही गोष्ट शके १३९० मध्ये घडली, असें दिसतें."
(संपादित)

नारायण विनायक कुलकर्णी
'संत कान्होपात्रा' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.