A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शिव-शक्तीचा तुझ्यात झाला

शिव-शक्तीचा तुझ्यात झाला नवीन आविष्कार
भूमातेचा कण कण गातो तुझाच जयजयकार

सातपुड्याला भेटायाला सह्यगिरी येई
पूर्णेच्या पाण्यास पूर्णता देते कामाई
बारा मावळ प्रांत विदर्भा देई पुण्याई
इये मराठिचिये नगरी भरे नवा दरबार

मराठमोळा घाट-घाट तव ताठर आवेष
मर्द मराठी कणखर बाणा दणकट खंदेश
नवा जिव्हाळा, नवा कळवळा, नवीन उन्मेष
नव्या युगाचा नवीन मानव घेई नव अवतार

पंजाबा तू देशमुखांच्या वंशा भूषविले
शिवतीर्थावर ज्ञानज्योतीचे अखंड तेज फुले
अंधारातून प्रकाशाकडे जन जागृत वळले
उपेक्षितांचा, पद-दलितांचा केला तू उद्धार
उन्मेष - ज्ञान / स्फूर्ती.
कामाई - कामाई देवी.
नोंद
हे गीत पंजाबराव देशमुख यांच्यावर लिहिले आहे.

  पृथक्‌

 

  दशरथ पुजारी, मोहनतारा अजिंक्य