A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वच्छ मोकळी हवा

स्वच्छ मोकळी हवा, त्यात गोड गारवा
मोद दाटतो मनी क्षणोक्षणी नवा नवा

हरित रान सळसळे, नाचती फुले मुले
पाखरे भराभरती नभातुनी उडे थवा

स्वैर झुळझुळे झरा, हासते वसुंधरा
डोलत्या पिकांमधून ये भरून गोडवा

बालवीर हे जमून एकसाथ चालले
वेगवेगळ्या मनात एक ध्येय बाणले
सौख्य द्या जगास, घ्या तयाकडून वाहवा

पातले अपेश का म्हणून कार्य सोडणे?
ठेच लागते म्हणून काय सोडू चालणे?
पडा रडा तरी उठा चला पुसून आसवा,
हाच मंत्र थोर देती, चाल नीट गाढवा
गीत - शंकर वैद्य
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर-
चित्रपट - चिमणराव गुंड्याभाऊ
गीत प्रकार - चित्रगीत, बालगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया alka@aathavanitli-gani.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
मोद - आनंद