माते धांव गे ॥
अर्पुनि म्लान मुखीं । चुंबनधारा ।
घे हृदयीं फुलवीं जिवाला ।
तव माया वेगें । माते धांव गे ॥
गीत | - | य. ना. टिपणीस |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वराविष्कार | - | ∙ बालगंधर्व ∙ पं. कुमार गंधर्व ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | आशा-निराशा |
ताल | - | कवाली |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, आई |
टीप - • गझल. |
दुहिता | - | कन्या. |
गंधर्व नाटकमंडळीचे मालक श्री. बालगंधर्व यांनी अनेक अडथळे आले असता सुद्धां उत्साहपूर्वक नाटक बसवून तें नेटाने, उत्तम सजावटीने रंगभूमीवर आणले व मला हरएक प्रकारचे साहाय्य केले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
श्री. कृष्णराव (मास्टर कृष्णा) यांनी नाटकातील प्रसंगांस शोभतील अशा चाली स्वतःच्या कल्पनेने निर्माण करून दिल्या म्हणून त्यांचेहि आभार मानणे जरूर आहे .
(संपादित)
यशवंत नारायण टिपणीस
'आशा-निराशा' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विश्वनाथ गोपाळ शेट्ये (प्रकाशक), मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.