स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे
रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना
नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना
त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे
आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा
आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा
चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे
वादळीं अंधारल्या पाण्यांतुनी तेजाळुनी
कामिनी आवेगवेडी येत आहे दामिनी
जाग आहे तोंवरी रे दीप हा लावून घे
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वराविष्कार | - | ∙ सुरेश वाडकर ∙ सुधीर फडके ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
टीप - • काव्य रचना- १५ सप्टेंबर १९५८. • स्वर- सुरेश वाडकर, संगीत- प्रभाकर पंडित. • स्वर- सुधीर फडके, संगीत- राम फाटक. |
दामिनी | - | सौदामिनी, आकाशात चमकणारी वीज. |
अनेक कवी, अनेक संगीतकार, अनेक गायक आणि साहित्यिक यांचं योगदान या कार्यक्रमाला लाभलं, लाभत आहे. अशा या दर्जेदार कार्यक्रमाचा उद्गाता मी आहे, याचा मला रास्त अभिमान आहे.
कार्यक्रमाचं स्वरूप कालमानाप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे म्हणा, बदललं आहे. सुरुवातीला योजलेला साहित्य आणि संगीत यांचा प्रतिष्ठित आणि दर्जेदार आविष्कार कितपत टिकून आहे, हे जाणत्या श्रोत्यांनीच ठरविलेलं बरं.
'स्वरचित्र' या कार्यक्रमात प्रथम सादर झालेलं गीत म्हणजे 'तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे.' कविश्रेष्ठ बोरकरांचं हे गीत गायिलं आहे प्रसिद्ध भावगीत गायक सुधीर फडके यांनी, आणि त्याचं रसग्रहण केलं आहे, प्रसिद्ध साहित्यिक गोपिनाथ तळवलकर यांनी. संगीत दिग्दर्शन माझं आहे.
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.