विसरुनी जा
तुझ्या जीवनी चुकुनी आले, चुकले होते वाट
यौवनाची आली चाहूल
तिथे थबकले प्रीतीपाऊल
परिचय झाला आणिक अवचित केली जिवाला साथ
दिनराती ज्या स्वप्नी रमले
प्रीतस्वप्न ते पुरे भंगले
दृष्ट लागली सांग कुणाची, फसला सारा घाट
इच्छा एकच उरी धरी मी
तुला वरावे पुढल्या जन्मी
या जन्मी तर असाच साहिन दैवाचा उत्पात
| गीत | - | गंगाधर महाम्बरे | 
| संगीत | - | यशवंत देव | 
| स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ साधना सरगम ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )  | 
              
| गीत प्रकार | - | भावगीत | 
टीप - • स्वर- आशा भोसले, संगीत- यशवंत देव • स्वर- साधना सरगम, संगीत- मंदार आपटे.  | 
| उत्पात | - | अनर्थ. | 
तारुण्यात पदार्पण करतानाच माझ्या आयुष्याची दहा वर्ष एल्फिन्स्टन कॉलेजच्या नोकरीत गेली. समान वयाची मुल दिलखुलासपणे आपल्या भावना माझ्यापाशी व्यक्त करीत. एकदा एका मुलीन आपल्या लग्नाची पत्रिका मला दिली. कॉलेजातीलच एका मुलावर तिचं नितान्त प्रेम होत. परंतु घरातील वडिलधार्या मंडळींना तसं सांगणं हाही गुन्हा वाटला. 'तू विसरुनी जा रे' हे गीत मनोमन जर कुणी गायलं असेल तर ते त्या मुलीनंच. कारण ते तिचंच गीत होतं.
श्री. यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं 'तू विसरूनी जा रे' हे गीत आजही अनेकांच्या 'मर्मबंधातली ठेव' आहे. मालवणाला भरलेल्या साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनात जेव्हा मी प्रथम हे गीत गायलं होतं तेव्हा आचार्य अत्रे, वि. द. घाटे, कवि अनिल यांनी दिलेल्या पसंतीच्या टाळ्या अद्याप माझ्या स्मरणात आहेत.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'मराठी युगुलगीते' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  











  इतर संदर्भ लेख