तुझं नि माझं जमेना
तुझं नि माझं जमेना
परि माझ्यावाचुन करमेना
आवड तुजला भांडायाची
तूहि शोधिसी संधी त्याची
कैसे होइल जीवन सुखकर,
जोवर तव ही रीती
हेच सुखाचे साधन सखये,
तरुणांच्या संसारी
मानशील का तू मज राणी?
होईन राजा मीहि त्याक्षणी
तू राजा, मी राणी जोवरी,
कोण कुणाचा धनी?
केव्हा मी तव स्वामी
केव्हा तू माझी स्वामिनी
परि माझ्यावाचुन करमेना
आवड तुजला भांडायाची
तूहि शोधिसी संधी त्याची
कैसे होइल जीवन सुखकर,
जोवर तव ही रीती
हेच सुखाचे साधन सखये,
तरुणांच्या संसारी
मानशील का तू मज राणी?
होईन राजा मीहि त्याक्षणी
तू राजा, मी राणी जोवरी,
कोण कुणाचा धनी?
केव्हा मी तव स्वामी
केव्हा तू माझी स्वामिनी
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | श्रीधर पार्सेकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे, मास्टर अविनाश |
नाटक | - | तुझं माझं जमेना |
गीत प्रकार | - | नमन नटवरा, युगुलगीत |
Print option will come back soon