A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उजळित जग मंगलमय

उजळित जग मंगलमय अरुणबिंब आले
सोनेरी किरणांनी भूमंडळ न्हाले ॥

देव हा प्रकाशमान
त्यास देति मुनिहि मान
अर्घ्यदान मंत्रगान करुनि शांत झाले ॥

नलिनी-दल आलिंगन
त्यजुनि भृंग करि गुंजन
कुंज कुंज मोहरले वनविहंग बोले ॥

रविराया पूजाया
काय फुले हो‍उनिया
गगनीचे तारांगण धरणीवर आले?
अर्घ्य - पूजा / सन्मान.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
कुंज - वेलींचा मांडव.
विहंग - विहग, पक्षी.