विनवित शबरी रघुराया
विनवित शबरी रघुराया रे
तुजसाठीं वेचिली बोरें
भागला भुकेला असशिल देवा
जमविला रानचा मेवा
दीनेची दुबळी सेवा
ही गोड मानुनी घे रे
विनवित शबरी रघुराया रे
नच उष्टावलि कुणि
मीच स्वयें तोडिली
चिमणीचे लाउनि दांत चवी घेतली
शिवली न दुजी पांखरें
मनिं शंका धरिसी कां रे
तुज मधुर लागतील हीं शबरीचीं बोरें
विनवित शबरी रघुराया रे
तुजसाठीं वेचिली बोरें
भागला भुकेला असशिल देवा
जमविला रानचा मेवा
दीनेची दुबळी सेवा
ही गोड मानुनी घे रे
विनवित शबरी रघुराया रे
नच उष्टावलि कुणि
मीच स्वयें तोडिली
चिमणीचे लाउनि दांत चवी घेतली
शिवली न दुजी पांखरें
मनिं शंका धरिसी कां रे
तुज मधुर लागतील हीं शबरीचीं बोरें
विनवित शबरी रघुराया रे
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | हिराबाई बडोदेकर |
गीत प्रकार | - | राम निरंजन, भावगीत |
भागणे | - | थकणे, दमणे. |
शबरी | - | एक भिल्लीण. श्रीरामांची एकनिष्ठ भक्तीण. |
केव्हा केव्हा मी विचार करतो की, राजाभाऊंची कविता सर्वप्रथम जनसामान्यांपर्यंत केव्हा जाऊन पोहोचली असेल? मला स्वतःला राजाभाऊंची पहिली कविता भेटली ती शबरीच्या विनवणीत, हिराबाई बडोदेकरांच्या आवाजात. अनेक वेळा ऐकल्यानंतर कुणी तरी जाणकाराने मला माहिती दिली की, हे गीत राजा बढे यांचे आणि त्याचे संगीतकार आहेत सुधीर फडके.
शबरी विनवित शबरी रघुराया रे
तुजसाठी वेचिली बोरें
शबरी विनवित शबरी रघुराया रे
तुजसाठी वेचिली बोरें
हिराबाई बडोदेकरांचा हीरक महोत्सव पुण्यात साजरा झाला, तेव्हा त्या समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने आलेले संगीतकार सुधीर फडकेंनी आपल्या भाषणात सांगितले होते की, या गीताला मी संगीत दिले तेव्हा मी कुणीच नव्हतो; पण माझे हे गीत गाऊन मला हिराबाईंनी या क्षेत्रात प्रतिष्ठा दिली.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.