A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विठ्ठल हा चित्तीं

विठ्ठल हा चित्तीं ।
गोड लागे गातां गितीं ॥१॥

आह्मां विठ्ठल जीवन ।
टाळ चिपुळिया धन ॥२॥

विठ्ठल विठ्ठल वाणी ।
अमृत हे संजिवनी ॥३॥

रंगला या रंगे ।
तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास जोशी
स्वराविष्कार- पं. भीमसेन जोशी
सुमन कल्याणपूर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी, विठ्ठल विठ्ठल
  
टीप -
• स्वर- भीमसेन जोशी, संगीत- श्रीनिवास जोशी.
• स्वर- सुमन कल्य़ाणपूर, संगीत- कमलाकर भागवत.
संजीवनी - नवजीवन / मेलेला प्राणी जिवंत करणारी विद्या.
भावार्थ-

  • विठ्ठलाची गाणी गाइली असता मनाला फार समाधान वाटते.
  • विठ्ठल हेच आमचे जीवन आहे. यामुळेच आम्ही जगतो. गाणी गाताना लागणार्‍या चिपळ्या व टाळ हीच आमची संपत्ती आहे.
  • विठ्ठलाचे नाव वाणीत आहे. आमच्या वाणीतले हे गोड नाव, अमृताप्रमाणे मेलेला जिवंत करण्याची शक्ती त्यात आहे.
  • तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाचे नाव घेण्यात मी रंगून गेलो आहे. सर्वांगांनी तल्लीन झालो आहे.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. भीमसेन जोशी
  सुमन कल्याणपूर