या डोळ्यांची दोन पाखरे
या डोळ्यांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासाविण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांस नभांगण, घरकुल तुमची छाती
सावलीतही बसतिल वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडुनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | पाठलाग |
राग | - | चंद्रकंस |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
Print option will come back soon