A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या कोकणात आता

फुलणार वैभवाने हर एक बाग, वाडी
या कोकणात आता येणार रेलगाडी

फिरणार हात पाठी जनमाय कोयनेचा
होणार यज्ञ येथे उद्योग साधनेचा
ये सूर्य सोनियाचा, अवशेष रात्र थोडी
या कोकणात आता येणार रेलगाडी

पेठा विलायतेच्या जिंकील आम्र-काजू
येवो कुबेर येथे मग दौलतीस मोजू
माशास सोनमासा देणार हीच खाडी
या कोकणात आता येणार रेलगाडी

मागास काल होता, हा प्रांत कोकणाचा
आशीर्वचास देई तो साद रे कुणाचा
लोखंड गंजलेले परिसास कोण जोडी
या कोकणात आता येणार रेलगाडी

राणी स्वत: स्वत:ची झाली स्वतंत्र माता
ठेवील दूर केवी ती बालकास आता
महाराष्ट्र-माय बाळा प्रेमे कुशीत ओढी
या कोकणात आता येणार रेलगाडी
कुबेर - देवांचा खजिनदार / श्रीमंत व्यक्ती.
केविं - कशा प्रकारे.
परीस - स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा दगड.
नोंद
कॉंग्रेस पक्ष प्रचार गीत.

  पृथक्‌