A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंगणात फुलल्या जाईजुई

अंगणात फुलल्या जाईजुई
जवळी ग पती माझा नाही

चैत्राची नवी नवलाई
गेली मोहरून ही आंबराई
दारी पोपट, साळुंकी गाई
जवळी ग पती माझा नाही

राया मी किती वाट पाहू?
कोणा जीव माझा उकलून दावू
रडू कुठवर मी धाईधाई
जवळी ग पती माझा नाही